|Monday, October 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शीख पोलीस अधिकाऱयाला पाकिस्तानात मारहाण

शीख पोलीस अधिकाऱयाला पाकिस्तानात मारहाण 

लाहोर

 पाकिस्तानातील एकमात्र शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंग यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे प्रकरण समोर आले. काही अधिकाऱयांनी आपल्याला कुटुंबीयांसोबत घरातून बाहेर काढले, आपल्याला पगडी देखील परिधान करू दिली नाही, पत्नी आणि तीन मुलांसमोरच मारहाण करण्यात आल्याचा आरोप सिंग यांनी केला. पाकिस्तानातून शिखांना बाहेर काढण्याचा प्रयत्नाचा हा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

सिंग हे लाहोरच्या गुरुद्वाराच्या लंगर हॉल परिसरात राहतात. हॉलमध्ये काही जण अवैध वास्तव्य करत होते, याचमुळे त्यांना हटविण्यात आल्याचा दावा पाकिस्तानच्या इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने केला. तर आपण न्यायालयाकडून स्थगिती आणली होती तरीही कारवाई झाल्याचे सिंग म्हणाले. 1947 पासूनच माझे कुटुंब पाकिस्तानात राहत आहे. दंगलीनंतर देखील आम्ही हा देश सोडला नाही, परंतु आता आम्हाला देश सोडण्यासाठी भाग पाडले जात आहे. माझे घर सील करण्यात आले असून माझ्या धार्मिक आस्थेचा अपमान करण्यात आल्याचा युक्तिवाद सिंग यांनी केला.

Related posts: