|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी

चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी 

जिल्हा परिषद सभापतीपदांची निवड बिनविरोध

विनोद झगडे, सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, साधना साळवी यांची निवड

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापतीपदांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेली निवड प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या वाटय़ाला समाजकल्याण व महिला बालकल्याण तर चिपळूण विधानसभा मतदार संघात अर्थ व शिक्षण सभापती तसेच बांधकाम व आरोग्य सभापतीपदे देण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर लगेचच दुसऱया दिवशी बुधवारी विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. 4 विषय समिती सभापतीपदांच्या शर्यतीत शिवसेनेत खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुके आग्रही होते. त्यावेळी खेड, गुहागरमधील इच्छुक सदस्यांना सभापतीपदांसाठी संधी मिळण्यासाठी सेनेतील एका गटाकडून जोर धरण्यात आला होता

इच्छुकांच्या शर्यतीत संमगेश्वर-धामापूर गटातील सहदेव बेटकर, चिपळूण अलोरे गटातील विनोद झगडे, खेडमधून सुनील मोरे, गुहागरमधून महेंद्र नाटेकर, रत्नागिरीमधून प्रकाश रसाळ, साधना साळवी यांचा समावेश होता. मात्र चिपळूण विधानसभा मतदार संघातील अलोरे, धामापूर तर रत्नागिरी या तालुक्यांना सभापतीपदांसाठी संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला.

त्यामुळे बुधवारी इच्छुकांच्या मनधरणीनंतर शिवसेनेकडून अर्थ व शिक्षण समिती सभापतीपदासाठी सहदेव बेटकर, समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रकाश रसाळ, परशु कदम, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदासाठी विनोद झगडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी साधना साळवी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज छाननीवेळी पाचही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी वैध ठरवले. परशु कदम यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध पार पडली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, गटनेते उदय बने, अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष थेराडे, उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, माजी अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे, माजी सभापती दिपक नागले, सदस्य संतोष गोवळे, रोहन बने, महेंद्र नाटेकर, माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सौ. रचना महाडिक, माजी अध्यक्षा स्नेहा सावंत, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आदी उपस्थित होते.

माजी पं. स. सभापती जि. प. चे सभापती

रत्नागिरी नाचणे गटाचे सदस्य प्रकाश रसाळ व कोतवडे गटाच्या सदस्या साधना साळवी या दोघांनी यापूर्वी पंचायत समिती सभापती पदे भूषवलेली आहेत. शिवसेनेकडून या दोघांना जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतीपदी संधी देण्यात आली आहे.

Related posts: