|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » निवडून येणाऱयालाच राष्ट्रवादीची खासदार, आमदारकीची उमेदवारी

निवडून येणाऱयालाच राष्ट्रवादीची खासदार, आमदारकीची उमेदवारी 

प्रतिनिधी/ सरवडे

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता, तरूणांचे संघटन व बेरजेचे राजकारण याचा विचार करून राष्ट्रवादी पक्ष उमेदवारी देईल. तसेच अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी जिल्हय़ातील तरूणांनी साथ दय़ावी असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

सोळांकूर ता. राधानगरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

पाटील म्हणाले, पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे, विकासकामे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी बुथ निहाय समित्या गरजेच्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष राज्यात प्रथम क्रमांकावर न्यायचा आहे. पक्षाचे सरचिटणीस अनिल साळोखे म्हणाले, राष्ट्रवादी संघटनेचे जाळे गावागावात उभे करावे लागणार आहे. लोकांनी आता अपडेट राहण्याची गरज भासत आहे. बाजार समितीचे संचालक नेताजी पाटील म्हणाले, पक्षामध्ये सर्वांनाच काम करण्याची संधी मिळण्यासाठी बुथ कमिटय़ा महत्वाच्या आहेत. इतर पक्ष काय करतात यापेक्षा आपण आपल्या पक्षाची व्याप्ती मोठी करायला हवी.

प्रास्ताविक बिद्रीचे संचालक एकनाथ पाटील यांनी व स्वागत नेताजी पाटील यांनी केले. यावेळी मोहन पाटील, कल्पेश चौगले, भिमराव कांबळे, दिपक भामटेकर, अशोक नायकवडे, युवराज वारके, संपत जाधव, आप्पा देसाई, विष्णू चरापले, स्वप्नील पाटील, विष्णू बारड उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सुत्रसंचालन केले. आभार जी. जी. चौगले यांनी मानले.

Related posts: