|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वृक्ष संवर्धनाच्या चळवळीची गरजःआमदार आबिटकर

वृक्ष संवर्धनाच्या चळवळीची गरजःआमदार आबिटकर 

वार्ताहर/ कूर

‘आपला महाराष्ट्र हरित महाराष्ट्र’ लोकसहभागातून वृक्षारोपणासह संवर्धनाची चळवळ वृद्धिंगत होण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा व महाराष्ट्र हरित बनवावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

महसूल, वन व पर्यावरण मंत्रालयाचा महत्वकांक्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ कुर (ता. भुदरगड) येथे आमदार प्रकाश आबिटकर व विभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांचे हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

युवा नेते राहुल देसाई, जि. प. सदस्य जीवन पाटील, उपसभापती अजित देसाई, सरपंच अनिल हळदकर, वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक नरेंद्र राजाज्ञा, वनक्षेत्रपाल राजन देसाई प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.

वन अधिकारी दीपक खाडे यांनी वृक्ष लागवडीसह संवर्धन व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. स्वागत सरपंच अनिल हळदकर यांनी केले. यावेळी पं. स. सदस्या आक्काताई नलवडे, स्नेहल परीट, उपसरपंच सुनील हळदकर, सदस्य तानाजी पाटील, सुरेंद्र धोंगडे, विलास दंडवते, वनपाल डी. जी. करडे, एस. डी. शिंदे, संजय राजिगरे, सुनील भारमल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक एस. एस. गुरव यांनी आभार मानले.

Related posts: