|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाच्या उमेदवारीत अनेकांची दांडी

कुपवाडात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाच्या उमेदवारीत अनेकांची दांडी 

प्रतिनिधी/ कुपवाड

 सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवारचा अखेरचा दिवस होता. कुपवाडमधील एक, दोन व आठ या तिन्ही प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपा-शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार, या अपेक्षेने शेवटच्या क्षणापर्यंत ‘एबी’ फॉर्मच्या प्रतिक्षेत बसलेल्यांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवक, नगरसेविकांसह अनेक निष्ठावंतांची दांडी उडवली असून नव्यांना संधी दिली आहे. भाजपा-शिवसेनेने मात्र आघाडीच्या विरोधात तगडे उमेदवार देवुन आव्हान उभे केले आहे. या कार्यालयात शेवटच्या दिवशी 120 उमेदवारांनी 152 अर्ज दाखल केले आहेत.

 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारीत डावललेल्यांमध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक गजानन मगदुम, उपमहापौर विजय घाडगे, राष्ट्रवादीचे जब्gाsर चौधरी, माजी गटनेते किरण सुर्यवंशी, नगरसेविका सौ.सुरेखा कांबळे व सौ.निर्मला जगदाळे यांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत कुपवाडच्या तिन्ही प्रभागात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आठ तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत.

 काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना आदी पक्षाने तिकीट देण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत गॅसवर ठेवले होते. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाचे कापले जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शेवटी चारही पक्षाने मोजक्या मातब्बरांना तिकीट दिले असले तरी अनेक दिग्गजांची मात्र पक्षाने दांडी उडवली आहे. तिकीट न मिळाल्याने निराश झालेल्या चारही पक्षातील बऱयाच दिग्गज उमेदवारांनी नेत्यांवर रोष व्यक्त करुन बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. अपक्षांचीही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे कुपवाडच्या एक, दोन व आठ या तीन प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना यांच्यात तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.

 प्रभाग एकमध्ये काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडातर्फे नगरसेवक धनपाल खोत, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या पत्नी सो.पद्मश्री पाटील व जमीर रंगरेज यांच्या भावजय सौ.रईसा रंगरेज तर भाजपाने युवानेते विश्वजीत पाटील, रवींद्र सदामते, सौ.सिंधुताई जाधव व सौ.माया गडदे व सुधार समितीने सचिन चोपडे यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागात मंगल पवार, धनश्री रुपनर, पुजा देवकाते, श्रद्धा दुधाळ, दिपाली काळेल, शलाका आलकुंटे, सायराबानु मुलाणी, प्रणाली कोळेकर अजमणी मुलाणी, संगीता सरगर, दिपाली कोळेकर, अजिंक्य मोहिते, अरविंद सकट, अजय माने, संजू लोढे, क्रांती कांबळे, अरुण आठवले, निर्मला जगदाळे, सुप्रिया पाटील, तेजस्वीनी जाधव, प्रियांका विचारे, अरुणा सुर्यवंशी, मालुश्री खोत, राजेदं पाटील, चेतन सुर्यवंशी, मोहन जाधव, विजय घाडगे, महादेव कोरे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. प्रभाग दोनमधुन आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, महावीर खोत, वहिदा नायकवडी व सौ.सविता मोहिते आणि भाजपाकडून प्रकाश ढंग, महेंद्र पाटील, सौ.सुनिता बुधनाळे, सो.सीमा वाघमोडे व शिवसेनेकडून शहराध्यक्ष अमोल पाटील, विठ्ठल संकपाळ व वैशाली धुमाळ तर जनता दलातून शफीक बुराण, सुधार समितीकडून प्रवीण कोकरे, दावुद मुजावर, गोरख व्हनकडे व साजीद मुजावर यांचा अर्ज दाखल झाला आहे. या प्रभागात गजानन मगदूम, सुनीता व्हनकडे, प्राजक्ता धोतरे, सरीता कांबळे, तेजश्री धोतरे, अश्वनी कांबळे, सुरेखा कांबळे, सुवर्णा यादव, प्रकाश पाटील, वाहीद बुराण, संतोष कोंळी, कुमार कांबळे, जुबेर चौधरी, समीर मालगांवे, देवगोंडा पाटील, महवीर पाटील, संजय शरदवाडे, मोहन जाधव, रामचंद्र कांबळे, संतोष चव्हाण, शांतकुमार कोळी बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. तर आठमधुन आघाडीकडुन नगरसेवक विष्णु माने,  रवींद्र खराडे, सौ.स्नेहा औंधकर व सुनीता जगधणे यांची आणि भाजपाकडून विशाल मोरे, राजेंद्र कुंभार, सौ.कल्पना कोळेकर व सोनाली सागरे तसेच शिवसेनेकडून रुपेश मोकाशी व अनिल माने यांची उमेदवारी फायनल झाली आहे. या प्रभागात यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करुन शोभा घोंगडे, नंदा साबळे, भारती भगत, मनीषा कांबळे, कोमल चव्हाण, छाया सरोदे, उज्वला वेटम, सविता मोहिते, स्वाती वायदंडे, प्रतिभा कवठेकर, सुजाता वायदंडे, कौसर मुलाणी, अर्चना कोळेकर, प्राजक्ता कोळेकर, शारदा हाके, श्रीकांत कोष्टी, महेश हरमलकर, युवराज शिंदे, सदाशिव पाटील, सुहास पाटील्। गजानन शिंदे, धनपाल पाटील, धनराज जाधव, अंकुश घुले, रवींद्र नगरकर, सुनील कोंगनोळे, सागर जंगम, सुनील भोसले, मकरंद कुलकर्णी, प्रसाद वाळकुंठें, रोंहीत नगरकर, संजप पाटील, अश्वीन पाटील, प्रकाश पाटील यांनी बंडखोरी करण्याची ठाम भुमिका घेतली आहे. त्यामुळे अनेकांना घाम फुटणार आहे.  कुपवाडमधील प्रभाग समिती तीन कार्यालयाकडे एक, दोन व आठ अशा तीन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अरविंद कोळी काम पाहत आहेत. कुपवाड महापालिका कार्यालयासमोर इच्छुक उमेदवार व कार्यकत्यांनी प्रचंड गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सहा.पो.निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कार्यालयाबाहेर कुपवाड पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Related posts: