|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ना.सदाभाऊ खोत समर्थक शेवाळेंवर खुनी हल्ला

ना.सदाभाऊ खोत समर्थक शेवाळेंवर खुनी हल्ला 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते गणेश हौसेराव शेवाळे (36, रा. बहे), यांच्यावर 10 ते 12 जणांच्या जमावाने खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा आकरा वाजता ताकारी रस्त्यावरील साई धाब्याजवळ ही घटना घडली. एस्सार पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे शेवाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात लोखंडी रॉड, दगड, वीटांचा वापर करण्यात आला आहे.

शेवाळे हे मंगळवारी रात्री एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी धाब्यावर येथे गेले होते. त्यांच्या समवेत विक्रम पाटील व अन्य मित्र होते. वाढदिवस कार्यक्रम संपल्यानंतर ते पाटील यांच्या चारचाकी गाडीजवळ आले. गाडीच्या आडोशाला लघुशंका करीत असताना संशयीत आरोपी यांनी जमाव केला. एस्सार पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक याने शेवाळे यांना काम आहे म्हणून बाजूला बोलावून घेतले. काही अंतर पुढे गेल्यानंतर सर्वांनी शेवाळे यांना शिवीगाळ सुरु केली. ‘तु रयत क्रांती संघटनेचा मोठा नेता झालास काय? सारखे सदाभाऊं बरोबर फिरतोस काय? तुला राजकारण काय असते, ते दाखवतो.’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये शेवाळे यांचा शर्ट फाटून ते जमिनीवर पडले.

त्यानंतर पंपाच्या व्यवस्थापकाने मोटारसायकलवर ठेवलेल्या रॉड घेवून शेवाळे यांच्या खांद्यावर व डोकीत मारला. दरम्यान दोन अनोळखी आरोपींनी जमिनीवर पडलेले दगड व विटांचे तुकडय़ांनी डोक्यात हल्ला चढवला. शेवाळे यांनी आरडा ओरडा केल्यानंतर त्यांचे मित्र संदीप मोहिते, संदीप दाते, रोहित कुरकुटे, विजय रावते हे धावले. त्यानंतर संशयीत आरोपींनी पळ काढला. दरम्यान शेवाळे यांचा मोबाईल व खिशातील सात ते आठ हजार रुपये पडून गहाळ झाले. शेवाळे यांना येथील इस्लामपूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. या प्ररकणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे हे करीत आहेत.

Related posts: