|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू

काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पोलीस दलातील कॉन्स्टेबल स्वप्निल किशोर जाधव (वय 32, रा. निरंजन अपार्टमेंट, चिमणपुरा पेठ, सातारा) यांचा कावीळ आजारामुळे मंगळवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, स्वप्निल जाधव हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कावीळ आजाराची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या लिव्हरची सूज कमी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात साथीचे आजार वाढू लागले

पावसाळय़ामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचू लागली असून त्यामुळे साथीचे आजार वाढू लागले आहे. त्यामुळे वेळीच पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच तुंबलेले गटार व साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सातारकरांमधून होत आहे. 

Related posts: