|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात सात हॉटेलवर कारवाईचा बडगा

कराडात सात हॉटेलवर कारवाईचा बडगा 

प्रतिनिधी/ कराड

शहरासह परिसरात रात्री वेळेची मर्यादा न पाळता हॉटेल सुरू ठेवल्याने पोलिसांनी सात हॉटेलवर कारवाई केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचा कार्यभार स्वीकारताच रात्रगस्तीवर असणाऱया सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मोहिमेने हॉटेल चालकांची पंचाईत झाली. हॉटेल चालकांनी वेळेची मर्यादा न पाळल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कराड, मलकापूर, सैदापुरात हॉटेल, परमीट रूम बिअर बारची संख्या मोठी आहे. शहरात पूर्वी रात्री खून, मारामाऱया, खंडणी उकळणे, लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रात्री साडेदहा ते अकरानंतर हॉटेल, पानटपऱयांसह बिअर बार सुरू न ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येत होती. मध्यंतरीच्या काळात हॉटेल, बिअर बारवरील कारवाईत खंड पडल्याने बऱयाच हॉटेल, बिअर चालकांनी आपली स्वतःची वेळ निश्चित केली होती. यातील अनेक हॉटेल, बिअरबार चालकांना राजाश्रय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती अशीही चर्चा होती. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी नियम न पाळणाऱयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी मंगळवारी रात्री वेळेचे बंधन न पाळणाऱया हॉटेल, बिअर बारवर कारवाई केली. एकूण सात हॉटेल, बिअरबारवर कारवाई केली आहे. शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी यापुढेही कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related posts: