|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम जाणून घ्या

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम जाणून घ्या 

प्रतिनिधी/   चिकोडी

दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो.  त्यातून लोकसंख्या वाढीमुळे होत असलेले दुष्परिणाम सांगण्यात येतात. पण त्याची जागृती होत नाही. भूकबळीसह अन्य कारणांनी मरणाऱयांची संख्या वाढत आहे. भविष्यात  देशात लोकसंख्यावाढीचे परिणाम अधिक निर्माण होऊ नयेत यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत प्रा. एन. व्ही. शिरगावकर यांनी  केले.

ते येथील आर. डी. पदवीपूर्व महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनी जिल्हा स्तरीय कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी स्वागत केले. जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. सावित्री भेंडीगिरी यांनी प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रम जिल्हा प्रशासन बेळगाव, जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा आरोग्य व कुटूंब कल्याण खाते बेळगाव, वैद्यकीय विज्ञान संस्था बेळगाव, भारतीय कुटूंब योजना संघ शिक्षण खाते, महिला व बाल कल्याण खाते, वार्ता व प्रसार खाते, नेहरु युवा केंद्र बेळगाव व विविध स्वयंसेवा संघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

प्रा. शिरगावकर पुढे म्हणाले, आपल्या देशाची वाढणारी लोकसंख्या व भौगोलिक व्याप्ती याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. भारत हा चिनपेक्षाही अधिक प्रगत असूनही वाढणारी लोकसंख्या भविष्य काळात भारतासाठी मोठे संकट ठरणार आहे.

भारताची लोकसंख्या आज 129 कोटींवर पोहचली आहे. लोकसंख्या वाढीमुळे अवलंबितांची संख्या वाढणार आहे. तसेच त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा व मूलभूत सुविधा उपलब्ध होणे कठीण बनणार आहे. याचा विचार प्रत्येकाने करुन लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खात्याशी हात मिळविणे गरजेचे आहे असे सांगितले. कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, आर. डी. महाविद्यालय, इंदिरा नगर, जय नगर, प्रभाकर कोरे नगर, के. सी. रोड, प्रभूवाडी चौक, बसस्थानक, महावीर चौक आदी मार्गाद्वारे पुन्हा आर. डी. महाविद्यालय या मार्गावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमात सदर मोहिमेसाठी काम केलेल्या डॉ. एम. व्ही. तुकारे, सूर्यकांत कांबळे, डॉ. आर. एस. उमदी, डॉ. सीमा गुंजाळ, डॉ.  रमेश दंडगी, डॉ. मंजुनाथ कुंभार आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ता. पं. अध्यक्षा उर्मिला पाटील, उपाध्यक्षा महादेवी नाईक, उपनगराध्यक्ष संदीप शेरखान, ता. पं. कार्यकारी अधिकारी के. एस. पाटील यांच्यासह अनेक डॉक्टर्स, अशा कार्यकर्त्या, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. 

Related posts: