|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » एअरटेल पेमेन्ट बँकेला ग्राहक बनवण्यास मंजुरी

एअरटेल पेमेन्ट बँकेला ग्राहक बनवण्यास मंजुरी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

एअरटेल पेमेन्टस् बँकेला नवीन ग्राहक बनवण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँक आणि युआयइडीआयकडून दुसऱयादा मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीला खातेदार आणि त्याची आधार जोडणी करण्यासही अनुमती देण्यात अली आहे.

एअरटेल कंपनी कडून यावर सांगण्यात आले कि शासकीय नियमावली आधीन राहून व आर्थिक व्यवहाराची माहिती घेऊन आम्ही बँकींग क्षेत्र कार्यरत ठेवणार असल्याची माहिती यावेळी  देण्यात आली.

एअरटेल पेमेन्ट बँक आणि वॉलेट यांच्याकडे सध्या 3 कोटी ग्राहक उपलब्ध असून इतर ग्राहकांची नोंदणी करण्याकरिता योजना राबवण्यात येणार आहेत. परंतु बँक नवीन खातेदार जोडू शकत नाहीत कारण याकरिता 9 मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या केवायसीच्या नियमाचे उल्लंघन प्रकरणी एअरटेल पेमेन्टस् बँकेला 5 कोटींचा दंड करण्यात आला होता.

 

Related posts: