|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » बीएमडब्ल्यूकडून ग्रॅन टुरिझ्मो स्पोर्टस् कार

बीएमडब्ल्यूकडून ग्रॅन टुरिझ्मो स्पोर्टस् कार 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

जर्मन कार कंपनीने गुरुवारी भारतात बीएमडब्ल्यू मालिका 3 ग्रॅन टुरिझ्मो स्पोर्टस् कार लाँच केली आहे. कारची शोरुम किंमत 46.6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

 कारची बांधणी चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात आली असून ग्राहकांच्या सुरक्षेकरिता कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दोन लिटर क्षमता असणारे चार सिलेंडर इंजिन या कारला असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली

बीएमडब्ल्यू ग्रुपकडून ग्राहकांना नवीन ऑपरेशन आणि टायनॅमिक ड्रायव्हींग करणाकरिता सर्वात चांगली संधी असणार आहे. आमच्या या उत्पादनाचा ग्राहक स्वीकार करतील असा विश्वास भारतातील कंपनीचे अध्यक्ष विक्रम पवाह यांनी व्यक्त केला आहे.