|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण उपनगराध्यक्ष भोजनेंना दंड व शिक्षा

चिपळूण उपनगराध्यक्ष भोजनेंना दंड व शिक्षा 

धनादेश न वटल्याने तीन महिन्यांची साधी कैद

5 लाख 20 हजाराचा दंड,

विमल स्टील मालकांच्या तक्रारीवर निर्णय

न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रतिनिधी /चिपळूण

चिपळूणचे विद्यमान उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांना धनादेश अवमानप्रकरणी न्यायालयाने तीन महिन्यांची साधी कैद व 5 लाख 20 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. कळंबस्ते येथील विमल स्टील कंपनीला साहीत्य खरेदीनंतर दिलेला धनादेश न वटल्याने ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी तब्बल पंधरा वर्षांनी गुरूवारी न्यायालयाने निकाल दिला. दरम्यान भोजने यांना या प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.

भोजने यांनी 2003 साली 2 लाख 60 हजार रूपयांचे साहित्य विमल स्टील कंपनीतून खरेदी केले होते. या रकमेचा धनादेश त्यांनी कंपनीच्या नावे दिला होता. मात्र हा हा धनादेश वटला नाही. त्यामुळे कंपनीचे सुनील जैन यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर तब्बल 15 वर्षे सुनावणी झाली. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने सहन्यायाधीश विक्रम जाधव यांनी गुरूवारी भोजने यांना मूळ रक्कमेच्या दुप्पट म्हणजेच 5 लाख 20 हजार रूपयांचा दंड व तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

भोजने हेही व्यावसायिक असून सध्या नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यामुळे त्यांनाच शिक्षा झाल्याने याचे वृत्त शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

Related posts: