|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भीषण अपघातात नाणार उपसरपंच ठार

भीषण अपघातात नाणार उपसरपंच ठार 

राजापूरनजीक बस-सुमोची समोरासमोर धडक

सुमो गाडीचा चक्काचूर, 3 गंभीर

20 प्रवासी किरकोळ जखमी

 

वार्ताहर /राजापूर

राजापूर शहरालगतच्या कोंढेतड-कणेरी दरम्यान एसटी बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सुमो चालक ठार झाला असून तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांतील सुमारे 20 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. गुरूवारी दुपारी 1 च्या सुमारास झालेल्या या अपघातात ठार झालेले संतोष गंगाराम गोलिपकर (45, नाणार, बौध्दवाडी) हे नाणारचे उपसरपंच आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजापूर आगाराची अणसुरे-राजापूर ही बस (एम.एच.14 बी.टी. 2429) घेऊन चालक गोविंद देवकाते व वाहक प्रल्हाद तेलंग 12 च्या सुमारास राजापूरकडे निघाले होते. दुपारी 1 च्या सुमारास एसटी बस राजापूर शहरालगतच्या कोंढेतड-कणेरी गावच्या सीमेलगत आली असता राजापूरहून प्रवासी घेऊन येणाऱया सुमोची (क्र.एम.एच.04 जी.ई. 1961) बसवर समारासमोर जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की सुमोचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातामध्ये सुमो चालक व नाणार उपसंरपंच संतोष गोलिपकर यांच्यासह सईदा मजीद बोरकर (60), झोया बोरकर (5 रा.कातळी) व सुनंदा मेस्त्राr (65, कणेरी) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना तत्काळ रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चालक संतोष गोलिपकर यांचा मृत्यू झाला. अपघातात भाग्यश्री शिरवडकर (28), सुजाता साळवी (45), सपना कदम (33), मनिषा खडपे (45) (सर्व रा. कणेरी) संपदा अवसरे (50, पडवे), प्रभाकर कदम (65, डोंगर), अशोक देवळेकर, सुंदर घाडी (60, नाणार), आरफीया मिरकर, जावेद पटेल, मुस्कान बाबाजी, नुरजहा पटेल, आशिया कुर्ले, भिकाजी तांबे, रामचंद्र खानविलकर, शिवराज कुळये, रामचंद्र राघव, आरफीया शेतले हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष नाना कुवळेकर, मनोज देवकर, नगरसेवक बंडय़ा बाकाळकर, नीलेश फाटक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, सुमोत अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यास मदत केली. आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे, नगरसेवक अनिल कुडाळी आदींसह राजापूर आगारप्रमुख धायतोंडे, सहकारी पाटील व एसटीच्या कर्मचारी तसेच राजापूरातील नागरीकांनी रूग्णालयात धाव घेतली.

नाणारवर शोककळा

या अपघातात मृत झालेले सुमो चालक संतोष गंगाराम गोलिपकर हे नाणार गावचे उपसरपंच होते. विविध सामाजिक कामांमध्ये तसेच गाव विकासासाठी ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण नाणारवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Related posts: