|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चांदोली धरण 70 टक्के भरले

चांदोली धरण 70 टक्के भरले 

प्रतिनिधी /शिराळा  :

आज दिवसभरात चांदोली पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. 1078 मिलीमिटर पावसाची नोंद आज झाली आहे. या मुसळधार पावसामुळे चांदोली धरण 70 टक्के भरले असून वारणा नदीला पुर आलेला आहे. नदी काठच्या गांवाना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

   चांदोली पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांच्यापासून सलग पाऊस बरसत होता. मध्येच दोन दिवस तो उघडझाप अशा आवस्थेत राहीला. परंतु आज मात्र सकाळपासून एकसारखा धो-धो पाऊस बरसत आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण तालुक्यातील इतर ठिकाणांच्यापेक्षा चांगल्या स्वरुपाचे आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी साठय़ात झपाटय़ाने वाढ झाली आहे. चांगला पाऊस पडल्यामुळे वारणा व मोरणा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशाराही पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे.

  मुसळधार पाऊस एकसारखा पडत असल्यामुळे वातारणातही कमालीचा गारठा जाणवून आला. शेतातील कामे पावसाअभावी थांबलेले चित्र शिराळा पश्चिम भागात होते. तर शिराळा उत्तर व पूर्व भागात दुपारपर्यंत शेती कामे सुरु होती. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्यामुळे शेती कामे पूर्णपणे थांबलीत. चांदोली धरणाच्या पाणीसाठय़ात आज कमालीची वाढ झाली आहे. आज सायंकाळपर्यंत शिराळा येथे 25, शिरशी 29, मांगले 16, कोकरुड 36, चरण 44, सांगाव 25, वारणावती 74 इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणपातळी  696.790 इतक्या उंचीची आहे. आज दिवसभरात चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण हे 1078 मिलीमिटरचे झालेले आहे. धरणातील पाणीसाठा हा 23.84 टीएमसी इतका झाला आहे. गुरुवार सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 69.29 इतक्या टक्केवारीपर्यंत पोहोचला आहे.