|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » नाणार प्रकल्प नाही लादणार – मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प नाही लादणार – मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नाणार प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे, नारायण राणेंनी हा प्रकल्प केल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे तसेच स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे.

प्रकल्पाबाबत आत्तापर्यंत राज्य व केंद्र सरकारची भूमिका हा प्रकल्प होणार अशी होती. त्यादृष्टीने विविध विदेशी सरकारांशी व कंपन्यांशीही करारही करण्यात आले होते. मात्र, विधीमंडळास संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आज पहिल्यांदाच मवाळ भूमिका घेतली असून विरोध कायम राहिला तर नाणार प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली आहे. या प्रकल्पाशी संबंधित सगळय़ांशी आमची चर्चा करायची तयारी आहे, इतकेच नाही तर आयआयटी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे, विरोधकांशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे चर्चा करूनच पुढे जाण्याची आमची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गालाही मोठय़ाप्रमाणावर विरोध झाला होता, परंतु चर्चेने तो प्रश्न सुटला आणि 93 टक्के जमीन सर्वसहमतीने मिळवण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे उदाहरण फडणवीसांनी दिले.

Related posts: