|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » दादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप

दादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप 

ऑनलाईन टीम / पुणे :

शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. वासावनी यांचे गुरूवारी सकाळी 9.01 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे सुरू आहे.

तत्पूर्वी साधू वासवानी मिशनपासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत त्यांचे देश, विदेशातील अनुयायी सहभागी झाले होते. दिवसभर वासवानी मिशनमध्ये त्यांचे अंत्यदर्शन खुले ठेवण्यात आले होते.त्यावेळी भजन आणि नामस्मरण करणे सुरु होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण आडवाणी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. संपूर्ण वातावरण भावुक झाले होते. अंत्यसंस्कारांपूर्वी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना आदरांजली वाहिली.

Related posts: