|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘रिलायन्स’चे बाजारमूल्य 7 लाख कोटी रुपयांवर

‘रिलायन्स’चे बाजारमूल्य 7 लाख कोटी रुपयांवर 

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या समभागातील तेजी कायम असल्याने कंपनीच्या बाजारमूल्यात वेगाने वाढ होत आहे. टीसीएसनंतर 7 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य गाठणारी ती दुसरी कंपनी शुक्रवारी ठरली. शुक्रवारी कंपनीचा समभाग 1,107 या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्याने बीएसईवर बाजारमूल्य 7,01,404 कोटी रुपयांवर पोहोचले.

गेल्या एका वर्षात कंपनीचा समभाग 44.3 टक्क्यांनी वधारला. 13 जुलै 2017 रोजी समभाग 753.35 या 52 आठवडय़ांच्या निचांकावर होता. चालू वर्षात कंपनीचा समभाग 19 टक्क्यांनी वधारला. नोव्हेंबरमध्ये कंपनीने 6 लाख कोटीचे बाजारमूल्य पार केले. 

मायक्रोसॉफ्ट पोहोचली 800 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये

मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन कंपनीचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 800 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. ऍपल, ऍमेझॉन, अल्फाबेट या कंपन्यांनंतर हा टप्पा मायक्रोसॉफ्टने गाठला. 951 अब्ज डॉलर्सच्या बाजारमूल्यासह जगातील पहिली लाख कोटी डॉलर्सची कंपनी बनण्याच्या स्पर्धेत ऍपल आहे.

Related posts: