|Friday, April 19, 2019
You are here: Home » उद्योग » इन्फोसिसकडून एकास एक बोनस समभाग जाहीर

इन्फोसिसकडून एकास एक बोनस समभाग जाहीर 

बेंगळूर

  देशातील आयटी क्षेत्रातील दुसऱया क्रमांकाची कंपनी इन्फोसिसने 2018-19 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. कंपनीचा नफा 2.11 टक्क्यांनी घटत 3,612 कोटी रुपयांवर पोहोचला. मार्च तिमाहीदरम्यान हा नफा 3,690 कोटी रुपयांचा होता. एकास एक बोनस समभाग देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

गेल्या तिमाहीतील कंपनीचे उत्पन्न 5.8 टक्क्यांनी वाढत 19,128 कोटी रुपयांवर पोहोचले. मार्च तिमाहीत कंपनीला 18,083 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तिमाहीच्या आधारे जून तिमाहीचे डॉलर उत्पन्न 0.9 टक्क्यांनी वाढत 283.1 कोटी डॉलरवर पोहोचले. कंपनीचा एबडिटा मार्जिन 24.7 टक्क्यांवरून 22.3 टक्क्यांवर पोहोचला. रुपयांमध्ये तो 4,472 कोटी रुपयांवरून 4,267 कोटी रुपयांवर पोहोचला. 10 कोटी डॉलरच्या ग्राहकांची संख्या 4 वरून गेल्या तिमाहीत 24 वर पोहोचली आहे. पहिल्या तिमाहीतील डिजिटल उत्पन्न 80.3 कोटी डॉलरवर पोहोचले असून त्यात 28.4 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली.

Related posts: