|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वाधिक धनाढय़ व्यक्ती

मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वाधिक धनाढय़ व्यक्ती 

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना टाकले मागे

वृत्तसंस्था/ मुंबई

चीनमधील अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. देशातील ई व्यापार क्षेत्रात उतरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे घोषित केल्यानंतर कंपनीच्या समभागात तेजी आल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजार बंद होण्यावेळी अंबानी यांची एकूण संपत्ती 44.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ब्लुमबर्ग बिलेनियर इन्डेक्सनुसार चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे जॅक मा यांची संपत्ती 44 अब्ज डॉलर्स आहे. चालू वर्षात अंबानी यांच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सने वाढ झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे, कंपनीची पेट्रोकेमिकल्स क्षमता दुप्पट करणे आणि गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओच्या यशस्वी कामगिरीची स्वागत केले आहे. 2018 मध्ये जॅक मा यांची संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्सने घटली आहे.

देशातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सची जिओ या उपकंपनीने क्रांती केल्यानंतर आता ई व्यापार क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेच्या ऍमेझॉन आणि वॉलमार्ट कंपन्यांबरोबर टक्कर होणार आहे. ऑगस्टपासून देशातील 1,100 शहरांमध्ये अतिवेगवान ब्रॉडबॅन्ड सेवा देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

Related posts: