|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अनुस्कुरा घाटात दरड कोसळून रत्नागिरी मार्ग बंद

अनुस्कुरा घाटात दरड कोसळून रत्नागिरी मार्ग बंद 

वार्ताहर/ पाटपन्हाळा

 दिवसभर कोसळत असलेल्या संततधार पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी जोडणा-या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. तसेच कासारी नदीवरील बर्की, करंजफेण, पेंडाखळे बंधारे पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

 मुसळधार पावसामुळे कासारी नदी पात्राबाहेर पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटपन्हाळा पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील पाटपन्हाळासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरुच असून हा मार्ग धोकादायक ठरत आहे. गुरुवारी दुपारी दरड कोसळल्याने दुपारपासून वाहतूक बंद होती परिणामी कोल्हापूरकडे जाणा-या प्रवाशांची मोठी कुचंबना झाली. बर्की बंधारा पाण्याखाली गेल्याने  बर्की  धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी परतावे लागले.