|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चंद्रभागेबाबत आ.निलम गोऱहेंची लक्षवेधी

चंद्रभागेबाबत आ.निलम गोऱहेंची लक्षवेधी 

पंढरपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील लाखो वारकरी भक्तांच्या श्रध्दाळू असणाऱया चंद्रभागेच्या स्वच्छतेविषयी आ. निलम गोऱहे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस यांनी मंदिर समिती, पालिका चंद्रभागा स्वच्छतेसाठी सध्या प्रयत्न करीत असल्याचे लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले आहे.

दक्षिणेची काशी म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूर ओळखले जाते. वर्षभर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला तर पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळते, त्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडतो. चंद्रभागा नदीकडे भाविक एक श्रद्धास्थान म्हणून पाहतात. मात्र अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर 16 मे 2018 पासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला व चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता भाविकांची अलोट गर्दी झाली असताना नदीच्या पात्रात मैलामिश्रित पाणी असल्याचे भाविकांना जाणवले होते, दुर्गंधीयुक्त व दुषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.

तसेच चंद्रभागेच्या तिरावर खड्डे खण्यामुळे त्या खड्डय़ामध्ये अनेक लहान मुले, महिला, पुरुष भाविक दगावण्याची शक्यता आहे. तसेच येथे निर्माल्य कुंड असावे तेही नाही. उजनीतून तातडीने पाणी सोडून गोपाळपूर बंधाऱयात या पाण्याचा साठा करावा याबबातही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

याबाबत मुख्यमंत्री फ्ढडणवीस त्यांच्या उत्तरात म्हणाले की, पंढरपूरमध्ये जेवढे सांडपाणी तयार होते त्याच्या तुलनेत सांडपाण्याचा निचरा करणारा प्रकल्प कार्यान्वित नाही. सध्या 15.50 एमएलडी सांडपाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आहे. मात्र सध्या 8 एमएलडी सांडपाण्याचा निचरा सध्या होतोय. म्हणून 2049 पर्यंत या शहराची सांडपाण्याचा निचरा होण्याची गरज लक्षात घेता एकात्मिक विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यात 59.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून 66 किलोमीटर ची नवीन अंडरलाईन सांडपाणी नेणारी पाईपलाईन टाकण्यात येणार असल्यांचे त्यांनी सांगितले. तसेच पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर देवस्थान समिती यांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून नदी पात्रातील  कचरा उचलण्यासाठी नेमली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: