|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारच्या कलाकारांचा शिवेंद्रराजेंच्या हस्ते सत्कार

सातारच्या कलाकारांचा शिवेंद्रराजेंच्या हस्ते सत्कार 

वार्ताहर / शाहूपुरी

अकलूज येथे प्रतापसिंह मोहिते-पाटील इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. या शॉर्टफिल्ममध्ये इंग्लंड, स्पेन, जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका देशांनी देखील सहभाग घेतला होता. साताऱयातील ‘नवस’ शॉर्टफिल्मने ऑफिशिअल बेस्ट टेन सिलेक्शनमध्ये झाले. या उज्ज्वल यशाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी इम्मी प्रोडक्शनच्या कलाकारांचा सत्कार केला. यावेळी राजू गोरे, अमोल मेणकर, अनिकेत शिंदे, सतीश जांगळे, सुशांत गोरे, सिध्दार्थ सालीम, अमर वांगडे, हर्षल वांगडे उपस्थित होते.