|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना आर्मीत मोठी संधी : कर्नल मोरे

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना आर्मीत मोठी संधी : कर्नल मोरे 

विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेवून आपले करिअर घडवावे

प्रतिनिधी/ सातारा

अंभियांत्रिकी शाखेतून पदवी घेणाऱया विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीत मोठी संधी असल्याचे मत कर्नल लेप्टनंट अमोल मोरे यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर पॉलिटेक्निल, लिंब येथे आयोजित केलेल्या ‘ऑफिसर्स ऑफ इंडियन आर्मी करिअर गार्डन्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या मनाली शहा, प्रा. संतोष वेळापूरे, टी.पी.ओ प्रा. सुधीर टंगसाळे, विजया राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कर्नल मोरे पुढे म्हणाले, आधुनिकतेने सुसज्ज होत असलेले इंडियन आर्मीत तंत्रज्ञान कौशल्याने विकसीत मनुष्यबळाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेवून करिअर आपले उज्ज्वल घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. 

प्रारंभी गौरीशंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काटेकर यांनी कर्नल मोरे यांचा बुके देवून सत्कार केला. प्रास्तविक व आभार अमोल निकम यांनी मानले. शत्रू राष्ट्राच्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी इंडियन आर्मी सक्षम आहे. स्पर्धाच्या युगात तत्रज्ञान सर्वात महत्त्वाचे ठरत असल्याने अभियांत्रिकी शाखाचे ज्ञान असणाऱया विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीत करिअर घडविण्याची संधी आहे, असे काटेकर यांनी सांगितले.