|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » leadingnews » 2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरूवात : अमित शाह

2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरूवात : अमित शाह 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

   2019मध्ये होणाऱया लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा राम मंदिरचा मुद्दा घेऊन निवडणूकीत उतरणार हे स्पष्ट आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाने राम मंदिर आयोध्येत बांधू असे अश्वासन दिले होते. काल हैदराबादमध्ये आमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर 2019 च्या निवडणूकीपूर्वी बांधण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.

   सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्मयता आहे. काल झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी योग्य ती पावले उचललेली जाणार अस्लयाचे स्पष्ट केले आहे. भाजपा नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेलंगणा राज्याच्या भाजपा कार्यलयात ही बैठक पार पडली. आतापर्यंत राम मंदिर वादविवादाच्या गोष्टीचा क्रम पाहिला तर 2019 च्या निवडणूकीपूर्वी बांधकामास सुरुवात होऊ शकते असे शाह यांनी बैठकीत सांगितले.

Related posts: