|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापुरात पावसाचा कहर ; पंचगंगा पात्राबाहेर, 63गावांचा संपर्क तुटला

कोल्हापुरात पावसाचा कहर ; पंचगंगा पात्राबाहेर, 63गावांचा संपर्क तुटला 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कोल्हापूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱया कोसळधारा मुळे जिलह्यात पाणीच-पाणी झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर आली आहे. कोल्हापूर जिलह्यातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरी वाहतूक अंशतः बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. शहरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळय़ाचे स्वरूप आले होते.

 

जिलह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिलह्यातील तब्बल 51 बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसयांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 16000 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

Related posts: