|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईला गेले काही दिवस पावसाने झोपडल्यानंतर दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली. मात्र येत्या 24 तासांत ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी 5मिटर उंचीचा लाटा उसळणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली तर राज्यातील बऱयाचा भागांमध्ये पावसाचा जोर मंदावलेला पहायला मिळतो. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

Related posts: