|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप

रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप 

ऑनलाईन टीम / कल्याण :

ठाणे जिह्यातील कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला रात्री साडेनऊच्या सुमारास 2.8 रिश्टर स्केल इतक्मया भूकंपाचे धक्के बसले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळय़ासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे.

रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 ते 3 मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी एलएनएनला दिली. अचानक बसलेल्या या हादऱयांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱयांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.

 

Related posts: