|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पुणे-बंगळुरू हायवेवर बसचा अपघात, बस चालकासह दोघांचा मृत्यू

पुणे-बंगळुरू हायवेवर बसचा अपघात, बस चालकासह दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगावमधील बडेकोळमठजवळ बस उलटून झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये चार प्रवाशी जखमी झाले असून शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात होती. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ड्रायव्हरच्या बाजुने बस दुभाजकाला आदळून उलटली. त्यात दोघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये बसचालक अशोक धुंडी यांचा समावेश आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 18 प्रवासी होते. घटनास्थळी हिरेबागेवाडी पोलिस पोहोचले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.