|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या

नवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या 

मीना देशपांडे यांचे कौतुकोद्गार; आचार्य अत्रे कट्टा आयोजित शिक्षक नवयुग वाचनमाला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मुंबई / प्रतिनिधी

लहान मुलांच्या पाठय़पुस्तकात अतिशय रुक्ष भाषेत साहित्य लिहिल्याने ते लहान मुलांना मुळीच आकलन होणार नाही. त्यांना त्यांच्या भाषेतच आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, अशा भाषेत साहित्य उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने आचार्य अत्रे यांनी नवयुग वाचनमाला लिहिली. शब्दाला ताल, लय, सूर असतो याची जाणीव नवयुग वाचनमालेतील प्रत्येक पाठात होते. मला तर ही वाचनमाला खूप आवडते. माझ्या अमेरिकेत असलेल्या नातवाला मी यातील गोष्टी इंग्ा्रजीत भाषांतरीत करून सांगितल्या. या वाचनमालेने महाराष्ट्रात पिढय़ाच्या पिढय़ा घडवल्या, असे कौतुकोद्गार आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी काढले.

शुक्रवारी दादर येथील ब्ा्राह्मण सेवा संघाच्या सभागफहात आचार्य अत्रे समिती, कुटुंब रंगलय काव्यात आणि ब्ा्राह्मण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य कट्टय़ाचे आयोजन केले होते. यंदा आचार्य अत्रे कट्टय़ावर शिक्षकांसाठी आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग वाचनमालेतील’ गद्य किंवा पद्य वाचन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला मुंबई ते थेट बदलापूरपर्यंत शाळांतील शिक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. तसेच, सुमारे 70 प्रवेशिका आल्या. त्यातील 35 शिक्षकांचे शुक्रवारी सादरीकरण झाले. तर, उर्वरित शिक्षकांची 9 सप्टेंबर रोजी पुढील आचार्य अत्रे कट्टय़ात स्पर्धा होईल. त्यावेळी ही बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी आचार्य अत्रे यांचे नातू ऍड. राजेंद्र पै, त्यांच्या पत्नी वीणा पै, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुकुंद आंदळकर, सुनंदा काळुसकर यांनी काम पाहिले.

शब्दसौंदर्य, शब्द सामर्थ्य, भावनेचे प्रकटीकरण या साहित्य गुणांची प्रचिती लहान मुलांना व्हावी, यासाठी आचार्य अत्रे यांनी वाचनमाला लिहिली. आचार्य अत्रे यांनी ज्या उद्देशाने नवयुग वाचनमाला लिहिली त्याचे आज सार्थक झाले, आज मी भरून पावलो, अशा भावना राजेंद्र पै यांनी व्यक्त केल्या. या नवयुग वाचनमालेतून शब्दातील नाद स्पर्श, रंगानुभव अशा विविध साहित्य गुण लहान मुलांना मिळतात. आम्हीही ही वाचनमाला वाचून मोठे झालो. आम्हाला आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे संस्कार मिळाले हे आमचे भाग्य आहे. शिक्षकांनी आणि मुलांनी वाचन हे केलेच पाहिजे, असे मत उषा मेहता यांनी व्यक्त केले. या स्पर्धेची संकल्पना विसूभाऊ बापट, उमा बापट यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. यावेळी एकपात्री नाटय़प्रयोग सादर करणारे नाटय़कर्मी सुरेश परांजपे, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र आवटी आणि आचार्य प्र.के.अत्रे समितीचे उमेश घैसास, ‘तरुण भारत संवाद’चे संपादक नरेंद्र कोठेकर, कवी शिवाजी गावटे, अमफता राव, आरती सदावर्ते, माधुरी गटणे आदी उपस्थित होते.

क्रमांक      विजेत्यांची नावे शाळेचे नाव

1    तेजस्विनी शिंगरे      उत्कर्ष विद्यामंदिर, मालाड

2    नेहांकी संखे         दहिसर विद्यामंदिर

3    किसन मोरे          चेंबूर हायस्कूल

4    माधुरी जोशी   टिळक विद्यालय, पार्ले

5    मनाली बंदरकर उदयाचल विद्यालय, विक्रोळी

6    मनीषा घेवडे   अनुयोग विद्यामंदिर, खार

Related posts: