|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » दुसऱया कसोटीवर यजमान विंडीजचे वर्चस्व

दुसऱया कसोटीवर यजमान विंडीजचे वर्चस्व 

वृत्तसंस्था/ किंग्जस्टन, जमैका

येथे सुरू असलेल्या बांगलादेश विरूद्धच्या दुसऱया कसोटीवर खेळाच्या दुसऱया दिवशी अखेर यजमान विंडीजने आपले वर्चस्व ठेवले आहे. पहिल्या डावात 254 धावा जमविल्या नंतर विंडीजने बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांत उखडले. विंडीजचा कर्णधार होल्डरने पाच गडी बाद केले.

विंडीजचा संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या आठवडय़ात या मालिकेतील पहिल्या कसोटीत विंडीजने तीन दिवसांतच विजय मिळविताना बांगलादेशचा एक डाव आणि 219 धावांनी दणदणीत पराभव केला होता. या दुसऱया कसोटीत विंडीजने 4 बाद 295 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. त्यांच्या उर्वरित सहा गोलंदाजांनी 59 धावांची भर घातली. सलामीच्या पेग बेथवेटने 9 चौकारांसह 110, हेटमेयरने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 86, कर्णधार होल्डरने 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 13, पॉवेलने 4 चौकारांसह 29, एस हॉपने 2 चौकारांसह 29, चेसने 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बांगलादेशच्या मेहंदी हसन मिराजने 93 धावांत 5 तसेच अबु जायेदने 38 धावांत 3 आणि टी इस्लामने 82 धावांत गडी बाद केले.

बांगलादेशच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बांगलादेशतर्फे सलामीच्या तमीम इक्बालने 6 चौकारांसह 47, कर्णधार शकीब अल हसनने 5 चौकारांसह 32, रहीमने 5 चौकारांसह 24, टी. इस्लामने 4 चौकारांसह 18, दासने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. बांगलादेशचा पहिला डाव 46.1 षटकांत 149 धावांत आटोपला. विंडीजने 205 धावांची भक्कम आघाडी मिळविली. विंडीज संघातून कसोटीत पदार्पण करणाऱया किमो पॉलने बांगलादेशच्या नुरल हसनला बाद करून आपला पहिला बळी नोंदविला. दुसऱया दिवसाअखेर विंडीजने दुसऱया डावात 9 षटकांत 1 बाद 19 धावा जमविल्या होत्या. सलामीचा ब्रेथवेट शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर 8 धावांवर बाद झाला. विंडीजने 224 धावांची आघाडी घेतली आहे.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प. डाव 112 षटकांत सर्वबाद 354 (बेथवेट 110, हेटमेयर 86, होल्डर नाबाद 33, एस हॉप 29, पॉवेल 29, चेस 20, मेहंदी हसन मिराज 5/93, अबु जायेद 3/38, टी. इस्लाम 2/82), बांगला देश प. डाव- 46.1 षटकांत सर्वबाद 149 ( तमीम इक्बाल 47, शकीब अल हसन 32, रहीम 24, टी. इस्लाम 18, होल्डर 5/44, गॅब्रियल 2/19, पॉल 2/25), विंडीज दु. डाव 9 षटकांत 1 बाद 19 (बेथवेट 8, स्मिथ खेळत आहे 8, शकीब अल हसन 1/0