|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुचाकीला कारच्या धडकेत युवक ठार

दुचाकीला कारच्या धडकेत युवक ठार 

वार्ताहर/ कुपवाड

कुपवाड हद्दितील तासगाव-मिरज रस्त्यावर बसथांब्या शेजारील एका कंपनीच्या समोरील रस्त्यावर कांचनपूरहून मिरजेकडे मोटारसायकलवरून जाणाऱया संतोष बाबासो कदम (35,रा.कांचनपूर, ता.मिरज) याला पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या एका चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संतोष कदम हा युवक मोटारसायकलीवरून कांचनपूरहून मिरजेकडे जात होता. तानंग गावाजवळील एका कंपनीच्या समोरील रस्त्यावर त्याच्या मोटारसायकलीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱया चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जखमी संतोष यांचे चुलतकाका बाबासाहेब गोविंद कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मिरजेतील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून पोलीस तपास करीत आहेत.