|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जावरील पाच टक्के सवलत घ्यायला पंधरा हजार यंत्रमागधारकांची बगल

कर्जावरील पाच टक्के सवलत घ्यायला पंधरा हजार यंत्रमागधारकांची बगल 

प्रतिनिधी/ सोलापूर

जागतिक मंदीमुळे सोलापूरसह राज्यभरातील यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. परिणामी या उद्योगावर काढलेली कोटय़वधीची कर्जे थकली आहेत. एका बाजूला कर्जाचा डोंगर आ†िण दुसऱया बाजूला अडचणीतील उद्योग अशा दुहेरी संकटात सापडलेल्या यंत्रमागधारक उद्योजकांना सहकार्याचा हात देण्यासाठी राज्य सरकारने सात महिन्यापूर्वी परिपत्रक काढून यंत्रमाग उद्योगांच्या कर्जावर पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या निर्णयाला सोलापुरातील 15 हजार यंत्रमाग उद्योजकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या योजनेचा लाभ घेण्याकडे उद्योजकांनी पाठ फ्ढिरवली आहे. एकीकडे सरकार मदत द्यायला तयार असताना दुसरीकडे ती घेतली जात नसताना सरकार आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी उद्योजकांची गत असल्याचे चित्र असल्याचे आहे.

विशेष म्हणजे यंत्रमागधारकांची यादी ज्या त्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती यंत्रमागधारकांच्या कार्यालयाकडे पाठविले पाहिजे. परंतु बँकांनी कोणत्याच यंत्रमागधारकांची यादी पाठविली नसल्यामुळे जिह्यातील एकाही यंत्रमागधारकांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेवू शकले नाहीत. जिह्यात 15 हजारच्या आसपास यंत्रमागधारक आहेत. त्यातील टॉवेलचे 14 हजार व हजार बाराशे रॅपिट लूमचे यंत्रमागधारक आहेत. जिह्यातील साध्या यंत्रमागधारकांनी आपला उद्योग उभारणीसाठी विविध बँकेकडून व वित्तीय संस्थाकडून कोटय़वधीचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज वेळेत फ्sढडणे अशक्य होत आहे. असे लक्षात आल्यानंतर शासनाने  यंत्रमागधारकांसाठी पाच कर्जावर टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना पाच टक्के व्याजामध्ये सूट मिळत असली तरी याचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांमध्ये उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. जिह्यातील एकाही यंत्रमागधारकांनी पाच टक्के सवलतीसाठी प्रस्ताव दाखल केला नाही.

सवलतीचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांना यंत्रमागधारकांचे नाव, मंजूर कर्जाची रक्कम, यंत्रमागधारकाने घेतलेल्या कर्जाचा प्रकार, कर्ज परतफ्sढडीचा अंतिम दिनांक, मुद्दल, व्याजाचा दर, मंजूर कर्जापैकी परतफ्sढड केलेली रक्कम, मंजूर कर्जापैकी शिल्लक रक्कम व शेरा अशी माहिती यंत्रमागधारकांना द्यावी लागणार आहे. परंतु बँकानी जिल्हा यंत्रमागधारकांच्या कार्यालयाकडे यंत्रमागधारकांची यादीच पाठविली नसल्यामुळे अद्याप एकही प्रस्ताव जिह्यातून दाखल झाला नाही. त्यामुळे शासनाची ही व्याज सवलत योजना कागदावरच राहणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

कारखानदाराला माहिती दिली पण…

यंत्रमागधारकांसाठी शासनाने व्याजावर पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु या शासननिर्णयाची व्यवस्थितपणे मा†िहती अद्याप दिली नाही. आम्ही सर्व यंत्रमागधारकांना योजनेचा लाभ घेण्यास सांगितले आहे. या शासन निर्णयाची माहिती बँकाना माहिती नसल्यामुळे बँकाकडून चालढकल केली जात आहे.