|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दीक्षाभूमीवर हिंदू आणि ब्राह्मण नकोत : ऍड. चिमणकर

दीक्षाभूमीवर हिंदू आणि ब्राह्मण नकोत : ऍड. चिमणकर 

प्रतिनिधी/ सोलापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर मोठी क्रांती केली आहे. दीक्षाभूमी आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी राजकीय लोकांना बोलाविल्याने दलित मूळ विचारांपासून भरकटले जात आहेत. त्यामुळे पुढील काळात कोणतेही राजकीय आणि हिंदू किंवा ब्राह्मण माणूस दीक्षाभूमीवर बोलवायचेच नाहीत, असा आपण निर्णय घेतला पाहिजे. यापुढे फक्त बौध भिक्षूकच दीक्षाभूमीवर येतील असे पाहुया, असे मत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक ऍड. विमलसूर्य चिमणकर यांनी केले.

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदिवसीय संमेलन पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषण करताना विमलसूर्य चिमणकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन सफाई कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, एम. आर. कांबळे, डॉ. सिद्धोदन कांबळे, डॉ. विमलकिर्ती, दादाराव लहाने, दत्ता गायकवाड, डॉ. सुनिल मगरे, सुबोध वाघमोडे, बाळासाहेब वाघमारे, प्रा. उत्तमराव क्षिरसागर आणि डॉ. औदुंबर मस्के यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मार्क्सवाद्यांनी आणि गांधीवाद्यांनी बाबासाहेबांप्रती काय केले? या मुख्य विषयाला अनुसरून एकदिवसीय संमेलन घेण्यात आले.

ऍड. विमलसूर्य चिमणकर म्हणाले, कुठल्याही आंबेडकरवाद्यांनी आजपर्यंत कधीच गांधीवाद आणि मार्क्सवाद्यांच्या विरोधात बोललेच नाही. गांधीवादी आणि मार्क्सवादी लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे शुद्ध विचार लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. माणुस मेला तरी विचार संपत नाही हे जितके खरे असले तरीही लायक अनुयाही न मिळाल्यास श्रेष्ठ व्यक्तींचे विचारही मरुन जातात. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. मार्क्सवादी आणि गांधीवादी विचारसरणीमुळे दलितांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्क्सवादी लोक आपल्या घरापर्यंत घुसले आहेत. याचे आपल्याला भानच राहिले नाही. त्यामुळे आपल्यातून मार्क्सवाद संपवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्यांचे मूळ विचार समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांचा अभ्यास करताना वर्तमानाचाही विचार समोर ठेवने गरजेचे आहे.

वाताहत लोकांना आंबेडकर गावात आणले

गावाबाहेर अनेक वाताहत लोक असायचे. गौतमबुद्ध अशा वाताहत लोकांना गावाच्या बाहेर जावून दिक्षा दिली. परंतु बुद्ध अशा लोकांना गावात घेवून येवू शकले नाही. डॉ. आंबेडकरांनी यापुढे जावून वाताहत झालेल्या लोकांना गावात घेवून आले. त्यांना योग्य शिक्षण व समाजात सन्मान मिळवून दिले.

वाल्मिकी समाजात आंबेडकरांचे विचार

यापूर्वी वाल्मिकी समाजाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले होते. वाल्मिकी समाजाचा समुदाय 20 राज्यात आहे. त्यांना जय भिमचा नारा देवून आंबेडकरांच्या विचारांमध्ये घेवून येणार असे चरणसिंग टाक यांनी आवर्जून सांगितले.

Related posts: