|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गटशिक्षणाधिकारी धुमाळांनी भरवला केंद्रात शिक्षकदरबार

गटशिक्षणाधिकारी धुमाळांनी भरवला केंद्रात शिक्षकदरबार 

प्रतिनिधी/ सातारा

तालुक्यातील शिक्षणाचा सावळा गोंधळ उडाला असून शिक्षक दबावाखाली कामकाज करत आहेत. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांचा कधी, कोणता आदेश येईल याचा नेम लागत नाही. त्यामुळे शिक्षक वचकून असतात.

धुमाळ यांना वर्षे पूर्ण झाल्याने चक्क त्यांनी तालुक्यातील शिक्षकांचा दरबारच शनिवारी सुट्टीच्या दिवशी गटसाधन केंद्रात भरल्याचे समजते. यावेळी शिक्षकांनी गर्दी केली होती. त्यांचा हारतुरे घालून सत्कार करण्यात आला होता. तालुक्यात 194 गावांमध्ये सुमारे 225 शाळा आहेत. यातील काही शाळांचे पत्रे पावळसाळ्यात उडालेत, काहींच्या भिंती पडल्यात, या समस्या सोडविण्याऐवजी दर्जेदार शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे.

धुमाळ यांचा फतवा कधी निघेल हे सांगता येत नाही, ते कोणत्याही वेळी काही शिक्षकांना आदेश देत असल्याने त्यांच्याबाबत तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. शनिवार हा शासकीय सुट्टीचा दिवस होता, तरीही त्यांना एकवर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी चक्क काही शिक्षकांना व कर्मचाऱयांना प्रशिक्षणाच्या नावाखाली बोलवले होते. याप्रसंगी त्यांनीही फार गाजावाजा न करता फुलांचा बुफे आणून कशाबशा त्यांना शुभेच्छा दिल्या अन् ते तिथून निघून गेले.

Related posts: