|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 15 फुट किंग कोब्रा हिवरे-सत्तरी येथे पकडला

15 फुट किंग कोब्रा हिवरे-सत्तरी येथे पकडला 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरी तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यापासून किंग कोब्रा लोकवस्तीत व आजुबाजुच्या परिसरात आढळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. सत्तरीतील हिवरे-बुद्रुक या ठिकाणी एका झाडावर 15 फूट लांबीच्या किंग कोब्रा पकडण्यात प्राणी मित्र विनोद सावंत यांनी यश मिळविले आहे.

हा कोब्रा पंधरा फूट लांबीचा असल्याची माहिती विनेद सावंत यांनी दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. हिवरे खुर्द या वस्तीमध्ये असलेला एका फणसाच्या झाडावर किंग कोब्रा असल्याचे काही नागरिकांनी पहिल्यानंतर याची माहिती वाऱयासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यासंबंधी प्राणीमित्र विनोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व शिताफीने त्याला ताब्यात घेतले व त्याला सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्याचे अभिनंदन केले असून वनखात्याचे अधिकारी महादेव गावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.