|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण व्यवसायाशी संलग्नीत उद्योजकांची साखळीत रॅली

खाण व्यवसायाशी संलग्नीत उद्योजकांची साखळीत रॅली 

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन साद

प्रतिनिधी/ डिचोली

खाण व्यवसाय गोव्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने खाण व्यवसायाशी संलग्नीत असलेले बरेच व्यवसाय व लहान मोठे उद्योग धंदे पडण्याची शक्यता आहे. याचा फटका यापूर्वी बऱयाचशा खाण व्यवसायाशी संलग्नीत असलेल्या लोकांना बसला आहे. आता उर्वरित सर्व संलग्नीत उद्योग बंद पडून गावचे गाव पूर्णपणे उद्धवस्त होण्यापूर्वी सरकारने खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. याच मागणीसाठी सोम. 16 जुलै रोजी आमोणे  येथील सेसा गेटजवळुन सर्व संलग्नीत उद्योजक, कामगार व लोक शांतता पूर्वक रॅली काढणार व साखळी रवींद्र भवन येथे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करणार आहे. अशी माहिती ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष निलकंठ गावस यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी नितीन फडते, सखाराम गावस, उदय जोशी, नारायण गावस यांचीही उपस्थिती होती. न्हावेली या गावांमध्ये सुमारे 2 लाख चौरस मीटर जागेत सेसाच्या वेदांत कंपनीचा मोठा प्लांट आहे. त्यात तयार होणारे पींग आयर्न व कोक देशात व बाहेरही जातो. या प्लांटमुळे अनेक ट्रक मालकांना काम मिळते. तसेच याच प्रकल्पाच्या बळावर या भागात अनेक उद्योग चालतात. मोठय़ाप्रमाणात लोकांचे लहान-मोठे धंदे व्यवसाय चालतात. दुकाने, हॉटेल, भाडय़ाच्या खोल्या व इतर प्रकारे लोक अशा प्रकल्पांवर अवलंबून आहेत. या सर्व लोकांना खाण क्षेत्राशी संलग्नीत उद्योग बंद पडल्यास मोटा फटका बसणार आहे.

वेदांताच्या सदर प्रकल्पावर मोठा प्रमाणात न्हावेली, आमोणा व परिसरातील लोक रोजगारासाठी आहे. या सर्व लोकांना घरी बसण्याची पाळी येईल. खाणबंदीमुळे सध्याच बेरोजगारी वाढलेली असताना हे संलग्नीत उद्योग धंदे बंद पडल्यास बेरोजगारी अधिक वाढणार आहे. खाण व्यवसाय केवळ खाणव्यास्त भागातील लोकांसाठी गरजेचा आहे असे नसून तो या व्यावसायाशी संबंधीत असलेल्या अनेक घटकांसाठी फायद्याचा आहे. खुद्द गोवा राज्याला आर्थिक दृष्टय़ा सर्वात मोठा लाभ या खाण व्यवसयाचा आहे.

हजारो नव्हे तर लाखो लोक या व्यवसायाशी जुळलेले आहे. म्हणूनच येत्या सोमवारी सकाळी 9 वा. आमोणा येथील सेसा कंपनीच्या गेट जवळून सुरू होणाऱया रॅलीत मोठय़ा संख्येने लोकांनी सहभागी व्हावे. जेणेकरून हा आवाज केंद्र सरकापर्यंत जायला पाहिजे. अशी निवेदन मुख्यमंत्री प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनाही देण्यात येतील असे निळकंठ गावस यांनी सांगितले.

र करणार

Related posts: