|Friday, March 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार लव्ह लफडे

मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार लव्ह लफडे 

दादासाहेब फाळकेंच्या कलाकृतींचा वारसा जपत काही तरुणांनी एकत्र येऊन ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. मात्र, हा चित्रपट चित्रपटगफहात प्रदर्शित न होता एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार आहे. अशाप्रकारे एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असेल.

  चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरे आहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी आणि कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

  तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱहाडे, रोहित राऊत, भारती मढवी या नव्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे. हा चित्रपट 20 जुलै 2018 रोजी एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार आहे.

Related posts: