|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गजानन महाराज पालखीचे जिह्यात आगमन

गजानन महाराज पालखीचे जिह्यात आगमन 

प्रतिनिधी/ सोलापूर

आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र शेगावहून पंढरपूरला निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिह्यात आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे आज रविवारी सायंकाळी जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

कासेगाव सीमेवर पालखीचे आगमन होताच पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ‘श्री’ची पूजा करण्यात आली. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रांतधिकारी ज्योती पाटील आदी उपस्थित होते.

गजानन महाराज पालखीसोबत दोन अश्व, गजराणी, बँडपथक, पताकाधारी भक्त आणि सुमारे दोनशे टाळकरी होते. पंरपरेनुसार कासेगाव हद्दीतील वीजविहीर परिसरात ग्रामस्थांकडून वारकऱयांना फराळ व चहा देण्यात आला. फराळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखी जिह्यातील पहिल्या मुक्कामासाठी उळे येथे रवाना झाली.

उळे येथे आल्यानंतर उळेकरांकडून वारकऱयांना पंगत देण्यात आली. येथील मुक्कानंतर सोमवारी (ता. 16) सोलापूर शहाराच्या दिशेने पालखी निघणार असून सकाळी 9 वाजता रूपाभवानी मंदिर येथील पाणी गिरणीजवळ आगमन होणार आहे. सोमवार 16 जुलै रोजी शहरातील कुचन प्रशालेत गजानन महाराज पालखीचा मुक्काम आहे. तर 17 जुलै रोजी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात मुक्काम असून 18 जुलै रोजी सकाळी देगाव रोड मार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

 

Related posts: