|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माऊलींचे दर्शन घेवून परतताना महिलेचा अपघाती मृत्यू

माऊलींचे दर्शन घेवून परतताना महिलेचा अपघाती मृत्यू 

vमहाबळेश्वरच्या सामाजिक कार्यकर्त्या कविता तोष्णीवाल यांना टँकरची धडक

वार्ताहर/ लोणंद 

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगाव मुक्कामी असताना शनिवारी मध्यरात्री दर्शन घेऊन परतणाऱया महिलेला टँकरने धडक दिली. यात कविता विशाल तोष्णीवाल (वय 42, रा. महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनानंतर तोष्णीवाल कुटुंब कारकडे येथे जात असताना कविता तोष्णीवाल दुभाजकावर थांबल्या होत्या. यावेळी लोणंदकडून फलटणकडे जाणाऱया टँकर (एम. एच 10 झेड 2708) ने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला टँकर चालक यशवंत रंगनाथ पावले (वय 30 वर्ष, रा पावलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली)  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार दत्तात्रय दिघे करीत आहेत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, सासू, सासरे, दिर, भावजय असा परिवार असून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कविता तोष्णीवाल लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा होत्या. महाबळेश्वरमधील व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर वेण्णालेक येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: