|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » पालखी सोहळ्यातील तीन भाविकांचा हृदयविकाराने मृत्यू

पालखी सोहळ्यातील तीन भाविकांचा हृदयविकाराने मृत्यू 

फलटण : प्रतिनिधी 

तरडगाव येथून फलटणच्या मुक्कामासाठीमाऊलींचे                                                                                               प्रस्थान होत असताना पालखी सोहळय़ातील तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलुबा तुळशीराम सोलने (वय 65 रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय 55 रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related posts: