|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बोगमाळोतील सरकारी शाळेत अकरा विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक

बोगमाळोतील सरकारी शाळेत अकरा विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक 

प्रतिनिधी/ वास्को

चिकोळणा बोगमाळो येथील एका शाळेत अकरा विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक सेवा बजावत आहेत. गोव्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता भासत असताना इथे मात्र, शिक्षकांना विद्यार्थ्यांची कमतरता आहे. या शिक्षकांवर सध्या तीन ते चार विद्यार्थ्यांना घेऊन बसण्याची पाळी आलेली आहे.

   हल्लीच गोव्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याच्या समस्या उघडकीस आल्या होत्या. विद्यार्थी जास्त अन् शिक्षक कमी असा प्रकार आढळत असतानाच चिकोळणा पंचायत क्षेत्रातील पोडशिरो गाळीन भागात असलेल्या सरकारी प्राथमीक शाळेत केवळ अकरा विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे आढळून आले आहे. या अकरा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी शिक्षक मात्र तीन आहेत. पटसंख्येअभावी ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहे.

  विशेष म्हणजे ही शाळात बोगमाळोच्या गावात असली तरी अकरापैकी दहा विद्यार्थी शाळेपासून बऱयाच दूर असलेल्या दाबोळी गावातून या शाळेत येतात. एक विद्यार्थी मात्र, बोगमाळोतच भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया कुटुंबातील आहे. त्यामुळे बोगमाळो गावाला या शाळेची गरजच नसल्याचे दिसत आहे. मात्र, इथे शिक्षक आणि कर्मचाऱयांचा प्रश्न उपस्थित होत असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच या शाळेची जास्त गरज असल्याचे चित्र आहे.