|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वडगाव येथील जुगारी अड्डय़ावर छापा

वडगाव येथील जुगारी अड्डय़ावर छापा 

16 जुगाऱयांना अटक, 31 हजार रुपये जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

मंगाईनगर, पाचवा क्रॉस येथील खुल्या जागेत सुरू असलेल्या एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून शहापूर पोलिसांनी 16 जुगाऱयांना अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. यावेळी 31 हजार 50 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मंगाईनगर येथील खुल्या जागेवर रविवारी अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच सायंकाळी या अड्डय़ावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. पेलिसांनी छापा टाकताच जुगाऱयांचे धाबे दणाणले. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे जुगाऱयांची संख्या अधिक होती. 16 जुगाऱयांना ताब्यात घेऊन त्यांना शहापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले.

जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतलेले बहुतेकजण कामगार आहेत. रविवारची सुटी घालविण्यासाठी त्यांनी अंदर-बाहर जुगार सुरू केला होता. याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून 16 जुगाऱयांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अटक करण्यात आलेले सर्व 16 जण वडगाव, खासबाग परिसरातील राहणारे आहेत.

गणेश इराप्पा उपरी (वय 26), राजू मल्लेशी लोकरे (वय 19), शाम पुंडलिक ढवळी (वय 20), मलिकजान मिरासाब फराळे (वय 25), यासीन बशीर इनामदार (वय 26), मोहीत महंमद नदाफ (वय 25), सागर रमेश बस्करी (वय 31), नंदकुमार विनायक पाटील (वय 20), नदीम सादीक सय्यद (वय 20), संजू गुंडू खाद्रोळकर (वय 30), मिलिंद रामण्णा शेट्टी (वय 26), पुणित शिवराज के.पी. (वय 19), इरफान हारुण बागेवाडी (वय 20), पवन रमेश कुडाळकर (वय 25), शमशेर अल्लाबक्ष पिरजादे (वय 27), अनिल रमेश गुंजीकर (वय 25) अशी त्यांची नावे आहेत.  

Related posts: