|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Automobiles » यमाहाची नवीन स्कूटर लॉंच

यमाहाची नवीन स्कूटर लॉंच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दुचाकींच्या नवनवीन मॉडेलमुळे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या यामाहा कंपनीची नवीन स्कूटर बाजारात आली आहे. यामाहाने Cygnus Ray ZR ‘Street Rally’ नावाने ही स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली. जपानी कंपनीच्या या नव्या मॉडेलच्या स्कूटरची राजधानी दिल्लीतील किंमत 57,898 रुपये एवढी आहे. यामाहाच्या Cygnus Ray ZR स्कूटरचेच हे नवीन मॉडेल आहे. कंपनीच्या ग्लोबल टू-व्हीलर मॉडेल्सच्या धरतीवर या गाडीची निर्मित्ती करण्यात आली आहे.

यामाहाच्या इतर दुचाकी आणि विशेषत: स्कूटर गाड्यांच्या तुलनेत ही गाडी स्पोर्टी आणि अग्रेसिव दिसून येते. देशभरात यामाहाची Street Rally एडिशन कंपनीच्या डीलरशिप्सनुसार जुलै 2018 पासून उपलब्ध होणार आहे. Yamaha Cygnus Ray ZR Street Rally मध्ये नवे डिजाइन आहे, जे Yamaha MT-09 च्या ‘विंग स्टाइल फेअरिंग’पासून प्रभावित आहे. या स्कूटरच्या मागील बाजूवर शार्प डिजाईन देण्यात आले आहे. तसेच स्पोर्टी मिरर आणि डीजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरही देण्यात आले आहे.

Yamaha Cygnus Ray ZR Street Rally स्कूटरमध्ये 113सीसी एअर कूल्ड ब्लू कोर इंजिन आहे. त्यामुळे 7.1bhp का पॉवर आणि 8.1Nm टॉर्क जेनरेट होण्यास मदत होते. या इंजिनला सीवीटी गियरबॉक्स देण्यात आला असून इंजिनमध्ये रोलर रॉकर आर्म आहे. ज्यामुळे कमी स्पीडवर पॉवर लॉस कमी करण्यास मदत होते. गाडीच्या पुढील बाजून 170 एम.एम. डिस्क ब्रेक आहे. त्यासोबतच, अलॉय वील्ज, 21 लिटरचे सीट स्टोअरेज, फ्रंट पॉकिट, की सिक्यूर ग्रीप सिस्टीम इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. सध्या लाल आणि रेसिंग ब्लू म्हणजे निळ्या कलरमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.

Related posts: