|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » महिला उद्योजकांमुळे 10 टक्के विकास दर

महिला उद्योजकांमुळे 10 टक्के विकास दर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात सलग तीन दशकापर्यंत 9 ते 10 टक्क्यांचा विकास दर कायम ठेवण्यासाठी आणि तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गातील उद्योगशीलता वाढविण्याची गरज आहे असे नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटले. काही राज्यांत महिलांच्या स्वास्थ्य, शिक्षण आणि पोषणाकडे विशेष लक्ष देण्यात न आल्याने काही मागास जिल्हय़ांतील प्रदर्शन अपेक्षेपेक्षा कमी कमी आहे असे त्यांनी म्हटले.
महिलांच्या परिस्थितीकडे लक्ष न दिल्यास पिढय़ांतील कुपोषणाची समस्या आणि बालमृत्यूदर वाढण्याची शक्यता कायम राहील. जीडीपीमध्ये महिलांचे अधिक योगदान असण्याची आवश्यकता आहे. आपल्या जीडीपीमध्ये महिलांचे योगदान 22 टक्के आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सरासरी 44 ते 45 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला जर तीन दशकांपर्यंत सतत 9 ते 10 टक्क्यांचा विकास दर कायम ठेवायचा आहे आणि वाढत्या लोकसंख्यांचा लाभ घ्यायचा आहे, तर देशाच्या विकासामध्ये महिलांच्या उद्योगशीलतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महिलांना संधी दिल्यास त्यांचे प्रदर्शन पुरुषांपेक्षा अधिक चांगली राहील. भारतात बदल करण्याची आवश्यकता असल्यास महिला उद्योजकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही खासगी कंपन्यांमध्ये महिलांना सीईओपदापर्यंत मजल मारली आहे, त्या कंपन्यांकडून उत्तम कामगिरी करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

Related posts: