|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सततच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया महत्त्वाच्या धरणांपैकी आणखी एक धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. तानसा धरण आज सकाळी 6 वाजून 15मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. तानसा धरणाआधी तुळशी, मोडकसागर आणि विहार हे तलावही तुडूंब भरली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे अवघ्या 8 दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया 7 तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया 7 तलावांत सध्या 9,34,211 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठी जमा झालेला आहे. हा पाणीसाठी मार्च 2019 अखेरपर्यंत पुरेल इतका आहे.

 

Related posts: