|Friday, March 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

खग्रास चंद्रग्रहणामुळे होणारे परिणाम

बुध. दि. 18  तश 24 जुलै 2018

येत्या 27 जुलै रोजी खग्रास चंद्रग्रहण होत असून संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसेल. दि. 27 जुलैच्या रात्री 11.54 वाजता ग्रहणास सुरुवात होईल व 28 च्या 3.49 वाजता सुटेल. ग्रहणाचा कालावधी 3 तास 55 मिनिटे राहील. मकर राशीतील उत्तराषाढा चतुर्थ चरण व श्रवण नक्षत्राच्या प्रथम चरणात हे ग्रहण होत आहे. ग्रहणासंदर्भातील सर्व माहिती पंचागांत दिलेली असते, ती पहावी. मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मीन या राशीना हे ग्रहण शुभ आहे. वृषभ, कर्क, धनू व कन्या या राशीना संमिश्र फळ मिळेल. मिथुन, तूळ, मकर व कुंभ या राशीना अनिष्ट फलदायक आहे. ग्रहण ही नैसर्गिक घटना असली तरी त्याची प्रखरता फार असते. त्यामुळे ग्रहण पाहिले तर काय होते असे म्हणून विषाची परीक्षा पाहू नये. चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही ग्रहांची नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्ती निरनिराळी असते. त्यातून अनेक विषारी शक्ती तयार होतात. ग्रहण काळात काही होणार नाही, पण कालांतराने त्याचे शुभाशुभ परिणाम दिसू लागतात. व ते पत्रिकेत स्पष्ट रुपाने दृगोच्चर होतात. ग्रहण काळात वनस्पती, पशुपक्षी व मनुष्यप्राणी यांच्यावर काय परिणाम होतात हे प्रत्यक्ष अनुभवता येते. चंद्रग्रहणाचा परिणाम द्रवपदार्थ, रक्ताभिसरण, जलाशय समुद्र, गर्भाशय, मासिक पाळी, मनुष्यप्राण्याची मनस्थिती,  भाग्योदय व नोकरी, उद्योग व्यवसाय यावर होत असतो. ग्रहण हे मुळातच अशुभ मानले जाते मग काही राशिना ते शुभ कसे ठरते? असा प्रश्न पडतो. जन्मकुंडलीत जी 12 घरे असतात, त्या प्रत्येक घराला शुभाशुभत्व दिलेले असते. जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचाच अधिक परिणाम होत असतो, म्हणूनच चंद ग्रहण व सूर्यग्रहण यांना अतिशय महत्त्व दिलेले आहे. ग्रहणाचा वेधकाल प्रत्यक्ष ग्रहण काल व त्यापुढील दुसरा दिवस करिदिन हे अशुभ मानलेले आहेत. त्यातही करिदिन हा अतिशय अनिष्ट मानलेला आहे. या दिवशी दैवी शक्तीपेक्षा आसूरी शक्तींचा प्रभाव अधिक असतो, म्हणून त्या दिवशी कोणतेही शुभ काम करीत नाहीत. करणीबाधा वगैरे प्रकार या ग्रहण व करिदिनाच्या काळातच जास्त होतात. काही लोकांना दुसऱयाचे चांगले झालेले बघवत  नाही व अशी माणसे इतरांचे नेहमी वाईट करण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा व्यक्ती चेहऱयावरून ओळखता येतात व पुढे मागे त्यांच्या पुढील पिढय़ांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी वाईट शक्तीचा प्रभाव जाणवू नये. यासाठी ग्रहणकाळात देवादिकांच मंत्र, स्तोत्रपठण, पुरश्चरण वगैरे करण्यास  सांगितले आहे. ग्रहण काळात केलेले मंत्रांचे पुरश्चरण त्वरित सिद्ध होते. आपल्याला आवडणाऱया कोणत्याही मंत्राचा जप ग्रहण काळात करावा.  (पूर्वार्ध)

मेष

अनेक महत्त्वाच्या घडामोडी या आठवडय़ात घडतील. धनलाभाच्या संधी येतील, रवि, बुध, शुभ लाभदायक असल्याने दैवी कृपा लाभेल. मंगळ, शनि अशुभयोग, मानसिक गोंधळ निर्माण करील. काही ठरलेली कामे अचानक बदलावी लागतील. रवि, चंद्राचा शुभयोग घराण्याचा उत्कर्ष करील. शुभवार्ता समजतील.


वृषभ

मौठय़ा कामात दिरंगाई निर्माण होण्याची शक्मयता आहे.  शारीरिक व्याधीपासून जपावे लागेल. शनि, मंगळ योग अचानक प्रवास, धनलाभ, मित्रमंडळींचे सहकार्य या दृष्टीने चांगले फळे देईल. पण कोणतेही काम सहजपणे होणार नाही. एखाद्या मोठय़ा व्यक्तीचे महत्त्वाचे काम तुमच्यामुळे होईल व त्याचा फायदाही होईल, कर्जप्रकरणे मिटतील.


मिथुन

कर्ज प्रकरणे, घरगुती सौख्य, प्रवास, मोठी कामे यासाठी हा सप्ताह वैशिष्टय़पूर्ण ठरेल. अनेक महत्त्वाच्या कामात यश देणारे ग्रहमान आहे. देवधर्माकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. संततीच्या बाबतीत स्थित्यंतरे घडतील. कुणालाही या आठवडय़ात शब्द देताना जागरुक रहा. अती दूरवरचे प्रवास टाळता आल्यास चांगले.


कर्क

रवि, शुक्र व बुधाचे सहकार्य तुम्हाला अनेक गोष्टीत चांगले यश देईल. तुमच्या चांगलुपणाचा कुणी फायदा घेणार नाही, यासाठी जपावे लागेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस योग्य नाही. मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकेल. वास्तुत महत्त्वाची स्थित्यंतरे घडू शकतात. जुनी प्रकरणे निकालात निघतील.


सिंह

भाग्योदयकारक योग. जीवनाला चांगले वळण देणारी ही  ग्रहस्थिती आहे. जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. पूर्वीचे सर्व नुकसान भरून निघण्यास सुरुवात होईल. राशीस्वामी रवि उत्साही असल्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आपले कोण परके कोण हे ओळखून वागणे आवश्यक.


कन्या

एकाचवेळी अनेक कामे हाती घेतल्याने आर्थिक बाबतीत अस्थैर्य निर्माण होईल. काही नवे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे बेत बदलावे लागतील. नवनव्या  कल्पना अमलात आणल्याने कामाचे कौतुक होईल. मानसिक ताण तणाव हळूहळू कमी होईल. जागा अथवा घर वगैरे घेणार असाल तर काळजी घ्यावी.


तुळ

महत्त्वाची कामे करायला जावे, वेळ नसावा व त्यातच अचानक पाहुणे यावेत असे विचित्र ग्रहमान आहे. मन शांत ठेवूनच निर्णय घ्यावे लागतील. कुणाच्याही भुलाव्यात येऊन नको तेथे गुंतवणूक करू नका. कुणालाही आपल्या मनातील गुप्तगोष्टी सांगू नका. अचानक कुणीतरी गौप्यस्फोट करण्याची शक्मयता आहे.


वृश्चिक

शुक्र, बुधाचे योग भाग्योदयाच्या दृष्टीने शुभ आहे. काही अपेक्षा पूर्ण करू शकाल. स्थगित झालेले काही आर्थिक व्यवहार पुन्हा मार्गस्थ होतील. धनलाभाच्या दृष्टीने  चांगले योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नव्या पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे रोजच्या कामकाजाचे वेळापत्रक बदलावे लागेल.


धनु

गुरु, शनि यांचा त्रिरेकादश योग, दैवीकृपा,  दैवीदृष्टांत, भाग्योदय, संततीसौख्य  कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटाघाटी दुकान व घरादारांचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतात. कौटुंबिक जीवनातील काही अडचणी कमी होतील. अडगळीतील वस्तुंना चांगला भाव येईल.


मकर

प्रवास, देणीघेणी, नवे स्नेहसंबंध या बाबतीत चांगले योग असून त्यात वाढ होईल. धनलाभाच्या दृष्टीने चंद्र, शुक्राचा योग मोठे लाभ घडविण्याची शक्मयता आहे. इतरांच्या चुकांमुळे वाहन अपघात व हृदयविकारापासून काळजी घ्यावी व सप्ताहात कुणाला शब्द देऊ नका. त्याचा गैरवापर होऊ शकेल. कामे रखडणार नाहीत याची काळजी घ्यावी.


कुंभ

गुरु, शुक्राचे साहचर्य चांगले आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक बाबतीत उत्साही वातावरण राहील. शनि, मंगळाच्या अनिष्ट प्रभावामुळे प्रवासात त्रास व अडचणी जाणवतील. साध्यासुध्या गोष्टीसाठी दुप्पट खर्च करावा लागेल. पण त्याचा पुढे फायदा होईल. राशीस्वामी शनि हा गुरुच्या शुभ योगात आहे. अवघड कामांना चालना मिळेल.


मीन

कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना गोंधळ होईल. एकाच कामासाठी दोन दोन वेळा झगडावे लागेल. चारचौघाच्या सल्ल्यानेच महत्त्वाचे निर्णय घ्या. तुमच्या वागणुकीचा काही लोक गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. अतिशय जपून वागावे लागेल. खासगी जीवनातील काही गोष्टी बाहेर पडू शकतात, पण त्यामुळे तुमचे अपार कष्ट लोकांना दिसून येतील. तुमच्याविषयी आदर वाढेल.

Related posts: