|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेरणोलीत दूध उत्पादकांकडून विद्यार्थ्यांना दूध वाटप

पेरणोलीत दूध उत्पादकांकडून विद्यार्थ्यांना दूध वाटप 

प्रतिनिधी/ आजरा

दूधाला थेट अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन छेडले आहे. यामुळे सोमवारी जिल्हा दूध संघाने दूध संकलन बंद करून या बंदला पाठिंबा दिला. ज्या उत्पादकांकडे मोठय़ा प्रमाणात दूध उत्पादन होते त्यांची अडचण झाली. पेरणोली येथे अशा उत्पादकांनी प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मोफत दूध वाटप केले.

ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात दूध उत्पादन केले जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षात मात्र दूध हाच प्रमुख व्यवसाय बनू पाहत आहे. तालुक्यात अनेक तरूणांनी गोठा पद्धत सुरू केली असून मोठय़ा प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. सोमवारी दूध संस्थांनी संकलन बंद केल्याने इतक्या दूधाचे करायचे काय असा प्रश्न मोठय़ा दूध उत्पादकांसमोर उभा राहीला होता. शेजाऱया-पाजाऱयांना दूध दिले गेले. पेरणोली येथील दत्ता पाईम व पांडूरंग पाईम यांनी प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मोफत दूध वाटप केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, राजू देसाई यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Related posts: