|Friday, March 22, 2019
You are here: Home » leadingnews » ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन असलेली सहा मजली इमारत आणि दुसरी एक इमारती कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाह बेरी व्हिलेज परिसरात या घटना घडल्या आहेत. इमारतींच्या ढिगाऱयाखाली अनेक जण अडकले गेल्याची शक्मयता वर्तवण्यात येते आहे.

पोलीस आणि एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होती. तर निर्माणाधीन सहा मजल्यांच्या इमारतीत फक्त मजूर राहत होते. दोन्ही इमारतीतले मिळून जवळपास 50 जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखालून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

 

Related posts: