|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे

ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / पुणे :

नीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली त्यांना ‘नीट’ परीक्षेत प्राधान्य मिळायला पाहिजे. इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते, तसा नियम आहे.राज्य सरकारने बाहेरच्या राज्यांतील मुले ‘नीट’च्या माध्यमातून् भरली तर आमचे त्याकडे लक्ष राहील.ही धमकी समजायची असेर तर समजा.असे राज यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ‘नीट’ परीक्षेवरुन राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘नीट’च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दरवषी ह्या समस्येला सामोरे जावे लागते. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली आहे त्यांना ‘नीट’मध्ये प्राधान्य मिळायला हवे, असे त्यांनी सांगितले. अन्य राज्यांनी अशा स्वरुपाचा कायदा केला आहे. मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? आज महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Related posts: