|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कोकण रेल्वेकडून गणपती स्पेशल

कोकण रेल्वेकडून गणपती स्पेशल 

प्रतिनिधी मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबाद, मडगाव, मंगळूर या विशेष ट्रेन पश्चिम रेल्वेवरुन चालविण्यात येणार आहेत.

मुंबई सेंट्रल ते मंगळूर (09001/09002) ही स्पेशल ट्रेन 12 व 19 सप्टेंबरल् रोजी धावणार असून मुंबई सेंट्रलहून रात्री 11.50 वाजता सुटणार असून मंगळूरला सायं 7.30 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी मंगळूर ते मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन 13 व 20 सप्टेंबरला रात्री 11.10 वाजता सुटणार असून मुंबई सेंट्रलला सायं. 7 वाजता पोहचणार आहे. या ट्रेनला बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भटकळ, बिंदूर, उडपी, मुलकी या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

वांदे ते मंगळूर (09009/09010) ही स्पेशल ट्रेन 11 व 18 सप्टेंबरला धावणार असून वांद्रेहून रात्री 11.55 वाजता सुटणार असून मंगळूरला सायं. 7.30 वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी मंगळूर ते वांद्रे स्पेशल ट्रेन 12 व 19 सप्टेंबरला रात्री 11.10 वाजता सुटणार असून वांद्रे येथे सायं. 7.45 वाजता पोहचणार आहे. वांद्रे ते मंगळूर (09011/09012) ही स्पेशल ट्रेन 9, 16 व 23 सप्टेंबरला धावणार असून वांद्रय़ाहून रात्री 11.55 वाजता सुटणार असून मंगळूरला सायं. 7.30 वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी मंगळूर ते वांद्रे स्पेशल ट्रेन 10, 17 व 24 सप्टेंबरला रात्री 11.10 वाजता सुटणार असून वांद्रेला सायं. 7.45 वाजता पोहचणार आहे. मुंबई सेंट्रल ते थिविम (09007/09008) ही स्पेशल ट्रेन 6, 8, 10, 13, 15, 17, 20 व 22 सप्टेंबरला धावणार असून मुंबई सेंट्रलहून रात्री 11.50 वाजता सुटणार असून थिविमला दु. 4 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी थिविम ते मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन 7, 9, 11, 14, 16, 18, 21 व 23 सप्टेंबरला दु. 4.30 वाजता सुटणार असून मुंबई सेंट्रलला स. 9.05 वाजता पोहचणार आहे. अहमदाबाद ते थिविम (09418/09417) ही स्पेशल ट्रेन 7, 14 व 21 सप्टेंबरला धावणार असून अहमदाबादहून दु. 4.15 वाजता सुटणार असून थिविमला दु. 4 वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी थिविम ते अहमदाबाद स्पेशल ट्रेन दु. 4.30 वाजता सुटणार असून अहमदाबादला दु. 4 वाजता पोहचणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. अहमदाबाद ते मडगाव  (09416/09415) ही स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार असल्याचेही कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Related posts: